हॉटेलमधून एलईडी, जनरेटर लंपास

Foto
शहरातील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रित मध्ये अज्ञात चोरट्याने एलईडी टीव्ही, जनरेटर बॅटरी, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा सुमारे 64 हजार रुपयांचे ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आले आहे. हॉटेल कर्मचारी प्रमोद शालीकराम यांनी दिलेली फिर्याद अशी की, 23 जून रोजी हॉटेल मधील एल.इ.डी. टीव्ही, जनरेटर बॅटरी, इतर इलकंट्रीक साहित्य चोरी झाल्याची घटना घडली होती.मात्र या बाबत हॉटेल मालक यांच्याशी चर्चा न झाल्याने काल संध्याकाळी या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.